वॉश आऊट : तालुका पोलिसांकडून 14 हजारांची दारू नष्ट

भुसावळ : भुसावळ तालुका पोलिसांनी वॉश आऊट मोहिमेंतर्गत रविवारी आठ ठिकाणी कारवाई करीत 14 हजार 230 रुपयांची गावठी दारू उद्ध्वस्त केली. या प्रकरणी स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आदेशानंतर पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या तीन दिवसांपासून पोलिसांकडून कारवाई सुरू असून 31 डिसेंबरपर्यंत ती चालणार आहे. आरोपींच्या ताब्यातून काही विदेशी मद्य जप्त करण्यात आले असून आरोप मात्र पसार झाले असून त्यांच्यावर अटकेची कारवाई सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
कारवाईने अवैध धंदे चालकांमध्ये खळबळ
शिवपूर कन्हाळा येथे दोन हजार 100 रुपयांची गावठी दारू नष्ट करण्यात आली. या प्रकरणी अनुष्य हसन गवळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तर भानखेडा येथूनही आरोपी जनार्धन नामदेव सपकाळे याच्या ताब्यातील दोन हजार 100 रुपयांची गावठी दारू नष्ट करण्यात आली. वराडसीम येथे आरोपी रमेश तुकाराम शिंदे याच्या ताब्यातून एक हजार 820 रुपयांची तर साकरी येथून एक हजार 400 रुपयांची गावठी दारू नष्ट करण्यात आली. या प्रकरणी आरोपी नारायण माधव मोरे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पिंपरीसेकम येथे आरोपी पांढरी तायडेच्या ताब्यातून एक हजार 750 रुपयांची तर किन्ही गावातून आरोपी रतन कांशीराम तायडे याच्या ताब्यातून दोन हजार 700 रुपयांची तसेच कुर्हेपानाचे गावातून लखन वाल्मिक कोळी याच्या ताब्यातील 780 रुपयांची गावठी दारू नष्ट करण्यात आली. दरम्यान, साकेगाव येथे 52 पत्त्याचा जुगार खेळणार्या सहा आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातील एक हजार 600 रुपये जप्त करण्यात आले.


