भुसावळातील खड्डेमय रस्त्यांची आमदार सावकारेंच्या पुढाकाराने दुरुस्ती


यावल रस्त्याचे काही दिवसात होणार काम : वाहनधारकांना मिळणार दिलासा

भुसावळ :  भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या पुढाकाराने सोमवारपासून राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळा, तापीरोड, बाजारपेठ पोलिस ठाणे, जामनेररोड नाहाटा चौफुलीपर्यंत, वसंत टॉकीज मार्ग, जळगावरोड आदी भागातील रस्त्यावरील खड्ड्यांच्या डागडूजीला सुरुवात करण्यात आल्याने वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, भुसावळ पोलिस दलातर्फे 5 जानेवारी रोजी ‘रन भुसावळ रन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून खड्ड्यांमुळे धावपटूंना त्रास न होण्यासाठी दखल घेण्याबाबत आमदारांना साकडे घालण्यात आले होते. रस्त्यांची डागडूजी होत असल्याने धावपटूंना मोठा दिलासा मिळाला आहे.

आमदारांकडून स्वखर्चाने दुरुस्ती : पालिकेची चालढकल
स्पर्धेच्या मार्गावरील मोठ-मोठ्या खड्ड्यांमुळे धावपटूना ईजा होण्याची भीती असल्याने पोलिस उपअधीक्षकांनी भुसावळ मुख्याधिकार्‍यांकडे दोन ते तीन वेळा पत्रव्यवहार केला मात्र जनतेच्या प्रश्‍नांचे काडीचेही देणेघेणे नसलेल्या मुख्याधिकार्‍यांनी कुठलीही दखल न घेतल्याने अखेर आयोजकांच्या शिष्टमंडळाने भुसावळचे आमदार संजय सावकारेंना साकडे घातले व आमदारांनी कामाबाबत आश्‍वासन दिले. मंगळवारी प्रत्यक्षात आमदार संजय सावकारे यांनी सोमवारपासून मॅरेथॉन मार्गाची स्वखर्चातून दुरुस्ती सुरू केल्याने समाधान व्यक्त केले.


कॉपी करू नका.