भुसावळातील हद्दपार आरोपी अमोल राणेस तलवारीसह अटक

भुसावळ : शहरातील वांजोळा रोडवर स्टार लॉन जवळ एक व्यक्ती धारदार तलवारीसारखे घातक शस्त्र घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाल्याने बाजारपेठ पोलिसांनी सापळा रचून त्यास अटक केली. अटक केलेल्या संशयीताचे नाव अमोल काशिनाथ राणे (23 रा.श्रीराम नगर वांजोळा रोड भुसावळ) आहे. त्याला एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे, असे असतांनाही तो शहरात तलवार घेऊन वावरत असल्याने त्याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत यांना मंगळवारी दुपारी एकला गुप्त माहिती मिळाली की, स्टार लॉनजवळ एक व्यक्त हातात धारदार शस्त्र घेऊन फिरत आहे. माहिती मिळताच निरीक्षक भागवत यांनी तात्काळ हवालदार माणिक सपकाळे, रविंद्र बिर्हाडे, रमण सुरळकर, उमाकांत पाटील,कृष्णा देशमुख, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी यांनी घटनास्थळ गाठले त्यावेळी एक व्यक्ती हातात तलवार घेऊन फिरत असलेला पाहीला. त्यांनी त्याच्याकडे जात असतांना त्यांने पळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यास अटक केली. त्याच्या हातात असलली 600 रूपये कींमतीची लोखंडी तलवारजप्त केली. त्याला पोलिस ठाण्यात आणून निरीक्षक भागवत यांच्या समोर हजर केले. पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून राणे यांच्या विरूध्द आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयीत हद्पार
पोलिसांनी पकडलेला संशयीत अमोल राणे हा एक वर्षासाठी हद्दपार केलेला आहे, हद्पार असतांना सुध्दा तो शहरात तलवार घेऊन फिरत असल्याने त्याच्या विरूध्द मुंबई पोलिस कायदा कलम 142 नुसार गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार जयराम खोडपे पुढील तपास करीत आहे. राणे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्या विरूध्द विविध प्रकारचे गुन्हे दाखल असून पोलिस अधीक्षक यांनी त्याच्या हद्दपारीचे आदेश काढले आहे.


