सचखंड, गोवा, झेलमसह नऊ गाड्यांना विलंब : प्रवाशांची गैरसोय


भुसावळ : दिल्लीसह उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर थंडी वाढल्याने तसेच धुक्याचे प्रमाण वाढल्याने दिल्ली आणि उत्तर भारतातून येणार्‍या सुमारे नऊ रेल्वे गाड्याने विलंबाने धावत असल्यान रेल्वे प्रवाशांना मोठा मनस्ताप सोसावा लागत आहे. भुसावळ स्थानकावर बाहेर गावाहून येणार्‍या प्रवासी हे वेळेपूर्वीच स्थानकावर येत आहे मात्र स्थानकावर आल्यावर गाडी लेट चालत असल्याची माहिती मिळाल्याने प्रवाशांना रेल्वे स्थानकावरच थांबून गाडीची वाट पहावी लागत आहे. आरक्षण काढलेले असल्याने प्रवाशांना त्याच गाडीने जाणे भाग असते त्यामुळे प्रवाशांना त्याच गाडीवर विसंबून राहावे लागत आहे. मंगळवारी विलंबाने धावणार्‍या गाड्यामध्ये सचखंड एक्स्प्रेस चार तास, गोवा एक्स्प्रेस आठ तास, महानगरी एक्स्प्रेस दोन, पाटलीपूत्र एक्स्प्रेस 2.15, पुष्पक एक्स्प्रेस सात तास, कनार्टक एक्स्प्रेस सहा तास, कामायनी एक्स्प्रेस दोन तास, झेलम एक्स्प्रेस चार तास तर डाऊन सचखंड एक्स्प्रेस पाच तास विलंबाने धावत असल्याचे सूत्रांनी सांगितले.


कॉपी करू नका.