एनआरएमयूच्या पाठपुराव्याने रेल्वेत 11 हजार पदांची भरती
भुसावळात महामंत्री वेणू नायर यांचा दावा : नव्या पेन्शन योजनेला विरोधच
Recruitment of 11 thousand posts in Railways with follow up of NRMU भुसावळ : रेल्वेचे दिवसागणिक आधूनिकीकरण होत असलतेरी रीक्त पदांचा सुकाळ भरणे तितकेच आवश्यक असून एनएमआरयूच्या पाठपुराव्यानंतर मध्य रेल्वेत 28 हजार रीक्त पदांपैकी 11 हजार 500 पद भरतीची प्रक्रिया सुरू असून संघटनेचा नव्या पेन्शन योजनेला विरोध राहणार असल्याची भूमिका एनआरएमयूचे महामंत्री वेणू नायर यांनी शहरात स्पष्ट केली. संघटनेच्या डीसी मिटींगसह संघटनेचे सचिव आर.आर.निकम यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त नायर सोमवारी शहरात आले होते. याप्रसंगी सायंकाळी पाच वाजता कामगार भवनात आयोजित पत्रकार परीषदेत त्यांनी माधम्यांशी संवाद साधला.
खाजगीकरणाला नेहमीच विरोध : पाठपुराव्याने भरती
मध्य रेल्वेत आतापर्यंत 28 हजार जागा रीक्त असून ही पदे भरण्यासंदर्भात संघटनेचा पाठपुरावा सुरू असून आता 11 हजार 500 पदांसाठी भरती सुरू असल्याची माहिती महामंत्री नायर यांनी दिली. रेल्वेचे खाजगीकरण होत असल्यासंदर्भात नायर यांना छेडले असता ते म्हणाले की, खाजगीकरणाला आमचा सुरूवातीपासून विरोध असून ही लढाई आमची सुरूच राहणार आहे. रेल्वेत सेवानिवृत्तीचे वय वाढवण्यासंदर्भात चर्चा सुरू असून त्यास आमचा विरोध राहणार असल्याचेही ते म्हणाले. मुळातच बेरोजगारी वाढत असताना आहे त्या कर्मचार्यांना पदावर संधी देणे योग्य नसल्याचे ते म्हणाले.

लासलगाव दुर्घटनेनंतर नियमावली
लासलगाव येथे रेल्वे दुर्घटनेत चार कामगारांना प्राण गमवावे लागले होते या घटनेकडे आपण कसे पाहता ? असे नायर यांना विचारल्यानंतर ते म्हणाले की, या दुर्घटनेत अधिकार्यांप्रमाणे कर्मचारीदेखील निश्चितच दोषी आहेत त्यामुळे कुणा एकावर जवाबदारी ढकलून चालणार नाही. कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करीत असताना घडलेली दुर्घटना निश्चितच दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. या दुर्घटनेनंतर मुंबई बोर्डाने ब्लॉकच्या ठिकाणी कामे करतानाची नियमावली बनवली असून ती सर्व डीआरएम कार्यालयांना पाठवण्यात आली असून त्या अनुषंगानेच आता कामे होणार असल्याचे ते म्हणाले. रेल्वे दवाखान्यांमध्ये डॉक्टरांची नियुक्ती केल्यानंतरही ते वर्षभर सुट्या टाकत असल्याने वैद्यकीय सेवा देण्यास अडचण येत असल्याचे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. पत्रकार परीषदेला मंडल सचिव आर.आर.निकम तसेच भुसावळ विभाग अध्यक्ष पुष्पेंद्र कापडे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. कोषाध्यक्ष गजानन ढोले, बाळा मोरे, पी.पी.बेंडाळे, अनंत झोपे, ए.टी.खंबायत, ईसरार खान, योगेश बारी, डी.यु.कोळी यांनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले.
