जळगावातील कुख्यात गुन्हेगार तन्वीर शेख स्थानबद्ध

गुन्हेगारी वर्तुळात खळबळ : आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची धडक मोहिम


जळगाव (शनिवार, 15 ऑगस्ट 2026) : आगामी सण-उत्सव शांततेत साजरे करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून गुन्हेगारी प्रवृत्तींविरोधात धडक कारवाई केल ीजात आहे. तब्बल 11 गंभीर गुन्हे दाखल असलेल्या जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तन्वीर उर्फ तन्या रहीम शेख (21, रा.नुरानी मशीदजवळ, गेंदालाल मिल, जळगाव) यास स्थानबद्ध करण्यात आली असून

11 गंभीर गुन्ह्यांची नोंद
तन्वीर ऊर्फ तन्या शेख याच्याविरुद्ध जळगाव शहर पोलीस ठाण्यात विविध स्वरूपाचे 11 गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. यामध्ये जबरी चोरीचे दोन, सरकारी नोकरावर हल्ला, दुखापत, दुखापतीसह दंगा, घरफोडी, आगळीक तसेच आर्म्स अ‍ॅक्टअंतर्गत गुन्ह्यांचा समावेश आहे.याशिवाय त्याच्याविरुद्ध विविध अदखलपात्र गुन्ह्यांचीही नोंद असून, 2022 ते 2026 या कालावधीत त्याच्यावर वारंवार प्रतिबंधक कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांच्या अहवालातून समोर आले आहे.





प्रतिबंधक कारवाईनंतरही गुन्हेगारी कायम
गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी त्याच्याविरुद्ध वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून फायनल बॉण्ड घेण्यात आला होता तसेच हद्दपारीची कारवाई करून त्याला तीन महिन्यांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते मा या कारवायांनंतरही त्याच्या वर्तनात अपेक्षित सुधारणा झाली नसून पुन्हा गुन्हे करण्याची प्रवृत्ती सुरूच राहिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

11 ऑगस्टला प्रस्ताव, 14 ऑगस्टला आदेश
तन्वीर शेख याला ‘धोकादायक व्यक्ती’ या संज्ञेत स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनी तयार करून 11 ऑगस्ट 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडे सादर केला. प्रस्तावाचे अवलोकन करून तो जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करण्यात आला. त्यानंतर 14 ऑगस्ट 2026 रोजी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी तन्वीर शेख याला येरवडा, जिल्हा पुणे येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.

पोलिस पथकाने घेतले ताब्यात
आदेशाची अंमलबजावणी करत जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड, महिला पोलीस उपनिरीक्षक तसेच पोलीस अंमलदारांच्या पथकाने तन्वीर शेख याला 14 ऑगस्ट रोजी ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !