यावल पंचायत समिती सभापतीपदी पल्लवी चौधरी


ईश्‍वर चिठ्ठीद्वारे उपसभापतीपदावर दीपक पाटील यांची वर्णी

यावल : पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाचा अडीच वर्ष कार्यकाळ पुर्ण झाल्याने गुरुवारी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. निवउणूक निर्णय अधिकारी तहसीलदार जितेंद्र कुवर होते. यावल पंचायत समितीच्या विद्यमान सभापती म्हणून भाजपाच्या मदतीने पल्लवी पुरूजीत चौधरी यांची निवड करण्यात आली तर ईश्वर चिठ्ठीद्वारे भाजपाचे दीपक नामदेव पाटील यांची उपसभापतीपदी वर्णी लागली. दरम्यान, यापूर्वीदेखील पल्लवी चौधरी यांना सभापतीपदासाठी अडीच वर्ष संधी मिळाली तर आरक्षणानंतर पुन्हा त्यांना संधी मिळाली असून भाजपाने पुन्हा पंचायत समिती आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवले आहे.

पल्लवी चौधरींना सभापतीपदाची संधी
पंचायत समितीत भाजपा व काँग्रेसचे पाच सदस्य संख्या असतांना मधल्या कालावधीत भाजपाच्या संध्या किशोर महाजन यांना पक्षाविरूद्ध कार्य केल्याबद्दल तसेच काँग्रेसच्या पंचायत समिती सदस्या लताबाई भगवान कोळी यांनी आपले जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याप्रकरणी अपात्र करण्यात आले होते. विद्यमान सभापती पल्लवी पुरुजीत चौधरी या अपक्ष म्हणुन निवडून आल्या असून त्यांना सभापतीपद हे ओबीसी महिला राखीव असल्याने त्यांना पुन्हा संधी मिळाली. उपसभापती पदासाठी भाजपाकडून दीपक नामदेव पाटील तर काँग्रेस पक्षाच्या वतीने शेखर सोपान पाटील यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजपा व काँग्रेसकडे प्रत्येकी चार असे संख्याबळ असल्याने उपसभापती पदासाठी समसमान मते पडल्याने स्वस्तिक प्रकाश धनगर या विद्यार्थ्याच्या हस्ते ईश्वरचिठ्ठी काढण्यात आल्यानंतर दीपक पाटील यांची उपसभापती पदावर वर्णी लागली. विशेष सभेला सर्व आठ सदस्य उपस्थित होते.


कॉपी करू नका.