सतर्कता चाचणीत भुसावळ रेल्वे प्रशासनातील अधिकारी ‘पास’

भुसावळ : भुसावळ-खंडवा रेल्वे मार्गावरील दुसखेडा ते सावदा दरम्यान असलेल्या लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांक 158 जवळ भुसावळ-कटनी पॅसेंजरने एका ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक दिल्याने अपघात झाल्याची माहिती भुसावळ विभागात कळताच शुक्रवारी सकाळी कळताच सतर्कतेसाठी हुटर वाजवून संदेश देताच यंत्रणा कामाला लागली. विविध विभागांचे अधिकारी तसेच कर्मचारी एकत्र जमल्यानंतर लागलीच अपघाताच्या दिशेने मेडिकल रीलिफ ट्रेन (एमआरटी) रवाना झाली तर अवघ्या काही वेळेत घटनास्थळी अधिकारी दाखल झाले मात्र प्रत्यक्षात घटनास्थळी अपघात झालाच नसल्याचे कळताच उपस्थित अधिकारी व कर्मचार्यांनी सुटकेचा श्वास घेतला तर कर्मचारी सतर्कतेसाठी ही मॉक ड्रील (सतर्कता चाचणी) असल्याचे सर्वांना दिलासा मिळाला व सतर्कतेतही अधिकारी पास झाले.
एआरटी आली माघारी
रेल्वे अपघातात सर्वात आधी अॅक्सीडेंट रीलिफ ट्रेन (एआरटी) घटनास्थळी पोहोचतील मात्र भुसावळातील या गाडीला इंजिन नसल्याने काही वेळाने ती अपघातस्थळाकडे निघाली मात्र मॉक ड्रील असल्याचे कळताच तिला माघारी बोलावण्यात आले. दरम्यान, नियोजित घटनास्थळी विभागीय डीआरएम विवेककुमार गुप्ता, अपर रेल्वे मंडळ प्रबंधक मनोज सिन्हा, वरीष्ठ वाणिज्य मंडळ प्रबंधक आर.के.शर्मा, वरीष्ठ मंडळ यांत्रिक अभियंता लक्ष्मीनारायण, वरीष्ठ मंडळ संरक्षा अधिकारी एन.के.अग्रवाल, वरीष्ठ मंडळ परीचालन प्रबंधक स्वप्नील नीला यांच्यासह अन्य अधिकार्यांनी धाव घेतली.


