बियाणी ज्युनिअर कॉलेजमध्ये ट्रॅडिशनल डे व साडी डे उत्साहात

भुसावळ : राष्ट्रीय शिक्षा समिती संचलित बियाणी ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘ट्रॅडिशनल डे’ व साडी डे उत्साहात साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी विविध प्रकारच्या पारंपरीक वेशभूषा साकारत लक्ष वेधले तर ‘आधुनिक काळात होणारे बदल’ या विषयावर वाद-विवाद स्पर्धा व उत्कृष्ट वेशभूषा यासारख्या स्पर्धा घेण्यात आल्या. कॉलेजच्या प्राचार्या सोफिया फ्रान्सिस यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. आपल्या परंपरेची जपणूक करून नव्याने पुढे वाटचाल करा, असे आवाहन प्राचार्यांनी केले.


