गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

शैक्षणिक दीपस्तंभ व्हाट्सअप ग्रुपचा उपक्रम
भुसावळ : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त येथील शैक्षणिक दीपस्तंभ या व्हाट्सअप ग्रुपने सामाजिक बांधीलकी जोपासत 3 रोजी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. यावल तालुक्यातील जिल्हा परीषद शाळा वाघळूद व जिल्हा परीषद शाळा बोरावल येथील विद्यार्थ्यांना पेन, पेन्सिल, रबर, वह्या आदी साहित्य वाटप करण्यात आले. सावित्रीबाई फुले यांचे कार्य महान होते, त्यांनी शिक्षणाचे नवे पर्व सुरू केल्याचे प्रतिपादन शैक्षणिक दीपस्तंभ परीवारातील सदस्य संजू भटकर यांनी केले. प्रसन्न बोरोले यांनी मनोगतात स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवून सावित्रीबाई फुले यांनी महिलांना सामाजिक प्रवाहात आणल्याचे सांगितले. माजी सरपंच कोकिळाबाई सपकाळे, योगेश धनगर, मनीषा पाटील, आर.आर.धनगर, ज्ञानेश्वर घुले, मिलिंद पाटील, पुष्कर चौधरी, हेमांगिनी चौधरी, प्रदीप सोनवणे, मिलिंद कोल्हे, संदीप पाटील, पंकज पाटील, सुनील वानखडे, जीवन महाजन, समाधान जाधव, अमितकुमार पाटील, दीपक वारके, योगीता बोंडे, देव सरकटे, अमित चौधरी उपस्थित होते.


