गोरनाळा येथील महिलेचा विनयभंग : सोन्याची पोत हिसकावली

Woman molested in Gornala : Gold texture seized जामनेर : तालुक्यातील गोरनाळा गावातील 35 वर्षीय महिलेच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करीत तिचा विनयभंग करण्यात आला शिवाय महिलेच्या गळ्यातील पोत तोडण्यात आल्याची घटना सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता घडली. या प्रकरणी भागवत उखर्डू पाटील (गोरनाळ) याच्याविरोधात जामनेर पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
महिलेला ठार मारण्याची धमकी
35 वर्षीय महिलेच्या तक्रारीनुसार, सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता त्या घरात धुणी-भांडी करीत असताना संशयित भागवत उखर्डू पाटील हा घरात शिरला व त्याने महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करीत महिलेला कॉटवर ओढले व संबंध न ठेवल्यास ठार मारण्याची धमकी दिली. यावेळी आरोपी महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत तोडली व पोत पाहिजे असल्यास शेतात ये, असे म्हटल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक जयसिंग राठोड करीत आहे.
