कजगावच्या सुभाष ललवाणींचा सन्मान
नाशिक जिल्हा जैन सांस्कृतिक कला फाऊंडेशनने घेतली कार्याची दखल
कजगाव, ता.भडगाव : कजगाव येथील मुळ रहिवासी पुणे येथे वास्तव्यास असलेले सुभाष ललवाणी यांना सन्मानित करण्यात आले. नाशिक जिल्हाा जैन सांस्कृतिक नाशिक- कला फाऊंडेशनच्या गेल्या अनेक वर्षापासून नववर्षाचे स्वागत तसेच विविध कार्यक्रम घेतले जातात. नुकतेच हास्य कवी संमेलन घेण्यात आले. प्रसंगी पद्मश्री सुरेन्द्र शर्मा, गोविंद राठी, कपिल जैन, रोहित शमा आदींनी आपल्या हास्यरस्य कविता/चुटकुले सादर केले. प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय कायकारीणी सदस्य सुभाष ललवाणी यांचा फाऊंडेशनद्वारा सुनील बुरड, लखीचंद पारख, मनीष सोनिमिंडे यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
रमणलाल लुंकड, विलास लोढा यांना समाज भूषण तर संजय मालपानी यांना आदर्श समाज रत्न, सुनीता बागरेचा यांना आदर्श पाठशाला शिक्षिका तर लताबाई लोढाा, पारस साखला, डॉ.प्रशांत बिरला, सोहनलाल भंडारी, शांतीलाल चोरडिया, ब्रिजलाल कटारिया, राजेंद्र लोढ़ा, आशीष नाहर, दिलीप चोरडिया, नेमीचंद भंडारी, महावीर भंसाली, विमला बाफना, अनिता पिंचा, संजय बोथरा, सुभाषबाबु लूंकड आदींनाही सन्मानीत रकण्यात आले.
फाउंडेशनचे अध्यक्ष मोहनलाल लोढा, कार्याध्यक्ष प्रवीण खाबिया, मोहनलाल कटारीया, सुभाष बाफना, कांतीलाल चोपडा, सुनील बुरड, सतीश हिरण, लखीचंद पारख, जे.सी.भंडारी आणि अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





