राज्यातील 14 उपजिल्हाधिकार्‍यांच्या बदल्या : जळगावात हे अधिकारी येणार बदलून


Transfers of 14 Sub-District Officers in the state: These officers will be transferred to Jalgaon भुसावळ  राज्य शासनाचे सहसचिव डॉ.माधव वीर यांनी राज्यातील 14 उपजिल्हाधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात नाशिकचे उपजिल्हाधिकारी अरविंद नरसीकर यांची अहमदनगर महसूल उपजिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली तर जळगावचे उपजिल्हाधिकारी किरण सावंत पाटील यांची श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी अहमदनगरच्या जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी बदलून येत आहेत.

या अधिकार्‍यांच्या राज्यात बदल्या
जळगावचे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांची अहमदनगर उपजिल्हा निवडणूक अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. अहमदनगरचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील यांची भुसावळ विभागाच्या प्रांतपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर अमळनेरच्या प्रांत सीमा अहिरे यांची नाशिक भूसंपादन अधिकारीपदी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी अद्याप कुणाच्या नियुक्तीचे आदेश नाहीत. धुळ्यातील महसूल उपजिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांची उपविभागीय अधिकारी निफाड येथे बदली करण्यात आली आहे तर जळगावचे विशेष भूसंपादन अधिकारी राजेंद्र वाघ यांची नाशिक निवासी उपजिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. धुळे निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांची जळगाव जिल्हापुरवठा अधिकारीपदी बदली करण्यात आली असून नंदुरबारचे जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार यांची धुळे जिल्हा पुरवठा अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. धुळ्यातील जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांची नाशिक जिल्हा पुरवठा अधिकारीपदी तर नाशिक जिल्हा पुर्नवसन अधिकारी नितीन गावंडे यांची धुळे रोहयोच्या उपजिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली. नाशिक उपजिल्हाधिकारी वासंती माळी यांची नाशिक वन जमाबंदी अधिकारीपदी तर नंदुरबार रोहयोचे उपजिल्हाधिकारी शाहुराज मोरे यांची अहमदनगर जिल्हा पुर्नवसन अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

या अधिकार्‍यांबाबत लवकरच आदेश
उर्मिला पाटील, अनिल पवार, गणेश मिसाळ, अर्चना पठारे, भागवत डोईफोडे, सुनील सूर्यवंशी, गोविंद दाणेज, पल्लवी निर्मळ या अधिकार्‍यांच्या बदलीबाबत लवकरच स्वतंत्र आदेश पारीत करण्यात येणार आहेत.


कॉपी करू नका.