बर्हाणपूरच्या महिलेची बस प्रवासात तीन लाखांची पोत लंपास : यावलला प्रवाशांची झाडाझडती

Burhanpur woman looted Rs 3 lakh in bus journey : Yavala was attacked by passengers यावल : चोपडा येथून बर्हाणपूरकडे निघालेल्या वृद्ध महिलेची बस प्रवासात चोरट्यांनी सुमारे तीन लाखांची पोत लांबवल्याची घटना गुरुवारी घडल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, महिलेच्या संशयानंतर कल्याण-रावेर बस गुरुवारी सायंकाळी यावल पोलीस ठाण्यात आणल्यानंतर 53 प्रवाशांची बारकाईने झडती घेण्यात आली मात्र पोत न मिळाल्याने महिलेला चोपडा येथे तक्रार देण्याचे सूचित केल्यानंतर बस पुढील प्रवासासाठी मार्गस्थ करण्यात आली.
यावलला प्रवाशांची झाडा-झडती
बर्हाणपूर शहरातील राजघाट भागातील रहिवासी बेबाबाई जगन्नाथ चव्हाण (61) या मुलगा शैलेंद्र चव्हाण सोबत चोपडा येथून बर्हाणपूर जाण्यासाठी कल्याण-रावेर बस (एम.एच.20 बी.एल.2271) मध्ये बसल्या मात्र महिलेची 40 ग्रॅम वजनाची व सुमारे तीन लाख रुपये किंमतीची पोत अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची बाब महिलेच्या धानोदा, ता.चोपडा येथे बस थांबल्यावर लक्षात आली. यानंतर महिलेने हा प्रकार कल्याण एस.टी.आगाराचे चालक ममराज हिरामण राठोड व वाहक भरत जगन्नाय माळी यांना कळवल्यानंतर बस सायंकाळी यावल पोलीस ठाण्यात आणण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली बसमधील 53 प्रवाशांची महिला व पुरूष कर्मचार्यांनी तपासणी केली मात्र त्यात पोत न आढळल्याने चोपडा येथे घडल्याची शक्यता गृहित धरून तेथे तक्रार दाखल करण्याचे महिलेला सूचित करण्यात आल्यानंतर बस पुढील प्रवासासाठी मार्गस्थ करण्यात आली.


