आता बोला : ट्रकची ताडफात्री फाडून चोरट्यांनी पाच लाखांचे शेंगदाणेच लांबवले
चाळीसगाव : नादुरूस्त ट्रक पेट्रोलपंपावर उभा असतांना अज्ञात भामट्यांनी ट्रकची ताडपडी फाडून पाच लाख 18 हजार 700 रुपयांचे शेंगदाण्याचे 99 कट्टे लांबवले. ही चाळीसगाव ते मेहुणबारे दरम्यान एका पेट्रोलपंपावर घडली. याप्रकरणी ट्रक चालकाने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा
रवींद्र गन्नाथ जाधव (सुभाषनगर, धुळे) हा ट्रक चालक सुमारे पाच लाख 18 हजार 700 रूपये किंमतीचे 91 कट्टे शेंगदाणे ट्रक (एम.एच. 18 ए.ए. 0963) मधून घेऊन जात असताना चाळीसगाव-मेहुणबारे दरम्यान ट्रक नादुरूस्त झाला. हा नादुरूस्त ट्रक नायरा पेट्रोल पंपावर उभा असतांना बुधवार, 10 मे रोजी पहाटे तीन ते दुपारी 2.30 वाजेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने ट्रकच्या मागील बाजूने दोरी तोडून व ताडपत्री फाडून शेंगदाणे लंपास केले. या प्रकरणी ट्रक चालक रवींद्र जगन्नाथ जाधव (धुळे) यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन ला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास हवालदार दत्तात्रय महाजन करीत आहे.