धुळ्यातील बसस्थानकात चोरटे सैराट : तीन महिलांच्या सोनपोत लांबवल्या


Thieves in the bus station in Dhule : Son-in-laws of three women were stolen धुळे : उन्हाळी सुट्यांमुळे तसेच 50 टक्के सवलतीच्या दरात महिलांना एस.टी.प्रवासाची मुभा मिळाल्यानंतर बसेसला वाढलेली गर्दी चोरट्यांच्या पथ्थ्यावर पडत आहे. धुळे शहरातील बसस्थानकात दिवसभरात तीन महिलांच्या सोन्याच्या पोत लांबवण्यात आल्याने महिलावर्गात भीती पसरली आहे.

दिवसभरात तीन दिवसभरातपोत लंपास
सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता जयश्री शिवाजी निळे (32, रा.पोलीस लाईन, धुळे) या महिलेची चार ग्रॅम वजनाची सोनपोत धमणार-साक्री बसने प्रवास करताना चोरट्यांनी लांबवली. दुसर्‍या घटनेत अश्विनी भूषण खैरनार (20, रा. मोहाडी उपनगर, धुळे) या अमळनेर-वापी बसने प्रवास करीत असताना त्यांच्या गळ्यातील पाच ग्रॅम वजनाची सोनपोत लांबवण्यात आली. तिसर्‍या घटनेत मनीषा भाऊसाहेब भोसले (40, रा.लोंढे, ता.चाळीसगाव) या महिलेची तीन ग्रॅम वजनाची सोन्याची पोत धुळे-धमणार- साक्री बसने प्रवास करताना लांबवण्यात आली. बसस्थानकात पोलिसांचा पुरेसा बंदोबस्त तैनात करून चोरट्यांना अटक करण्याची मागणी प्रवासीवर्गातून होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !