कजगावात सराफा दुकानातून 65 हजारांचे दागिने लांबवले

Jewelery worth 65 thousand was stolen from a bullion shop in Kajgaon भडगाव : भडगाव तालुक्यातील कजगाव गावातील महावीर ज्वेलर्समध्ये आलेल्या चोरट्याने 65 हजारांचे दागिणे लांबवल्याचा प्रकार रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास उघडकीस आला. या प्रकरणी डडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सीसीटीव्हीत फुटेज कैद
भडगाव तालुक्यातील कजगाव येथे महावीर ज्वेलर्स हे निलेश सुभाष जैन यांच्या मालकीचे दुकान आहे. रविवार, 20 मे रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास दुकान सुरू असताना अंगात पांढरा शर्ट व डोक्यात कॅप परीधान केलेल्या संशयिताने दुकानात प्रवेश करीत नजर चुकवून ड्रावरमध्ये ठेवलेले 15 हजार रुपये किंमतीच्या सोन्याचे रींगा व 50 हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत असा एकूण 65 हजारांचो ऐवज लांबवला. हा प्रकार घडल्यानंतर दुकानदार निलेश जैन यांनी भडगाव पोलिसात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक नरेंद्र विसपुते करीत आहे.


