धुळ्यातील तरुण शेतकर्‍याच्या हत्येचा उलगडा : दोघांना अटक ; समोर आले ‘हे’ कारण


Solved the murder of a young farmer in Dhule : Two arrested; This is the reason that came to the fore धुळे : धुळे तालुक्यातील पिंपरखेडा ते उभंड दरम्यान असलेल्या बारीत गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास धुळ्यातील तरुण शेतकरी यशवंत सुरेश बागुल (38, रा.मिलिंद सोसायटी, साक्री रोड, धुळे) यांची गोळ्या झाडून व चाकूचे वार करीत हत्या करण्यात आली होती. हत्याकांड प्रकरणी धुळे तालुका पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेने दोघा आरोपींच्या अवघ्या 24 तासात गुन्ह्यात उकल करीत मुसक्या आवळल्या आहेत. पंकज राजेंद्र मोहिते व आनंद मोहिते (उभंड नांद्रा, ता.धुळे) यांना अटक करण्यात आली आहे. मयत बागुल यांच्याकडून होणार्‍या मानसिक त्रासामुळेच नातेवाईक असलेल्या संशयितांनी हे हत्याकांड घडवल्याची कबुली संशयितांनी यंत्रणेला दिली आहे.

गोळ्या झाडून केली हत्या
धुळे शहरातील साक्री रोडवरील मिलिंद सोसायटीतील यशवंत सुरेश बागुल यांनी धुळे तालुक्यातील उभंड नांद्रे येथे शेती घेतल्याने गुरुवारी सायंकाळी ते शेतमजूर शोधण्यासाठी ते मामेभाऊ पंकज राजेंद्र मोहिते सोबत पिंपरखेडा येथे गेले होते व परतीच्या प्रवासात पिंपरखेडा ते उभंड दरम्यान असलेल्या बारीत दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळी झाडून तसेच चाकूचे वार करीत हत्या केली होती.

यांनी आवळल्या संशयितांच्या मुसक्या
हत्याकांड प्रकरणी धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील योगेश राऊत, प्रकाश पाटील, संजय पाटील, दिलीप खोंडे, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, योगेश चव्हाण, पंकज खैरमोडे, किशोर पाटील, अमोल जाधव, सुनील पाटील, राजू गीते, कैलास महाजन तसेच धुळे तालुका पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील अनिल महाजन, प्रवीण पाटील, किशोर खैरनार, मुकेश पवार, धीरज पाटील, कुणाल शिंगाणे, अमोल कापसे, राकेश मोरे, प्रमोद पाटील, नितीन दिवसे, कांतीलाल शिरसाठ आदींच्या पथकाने संशयितांच्या मुसक्या आवळल्या.


कॉपी करू नका.