यावल शहरात हडकाई नदीच्या पुलावरून कार कोसळली : सुदैवाने प्राणहाणी टळली
Car falls from Hadkai river bridge in Yaval city : Fortunately no casualties यावल : शहरातील डांगपूरा भागात हडकाई नदीच्या पुलावरून अचानक कार रीव्हर्स करताना पुलाच्या खाली कोसळली. सुदैवाने यात केवळ चालक होता आणि प्रसंगावधान राखत त्याने उडी घेतल्याने प्राणहानी ठरली मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे.
रीव्हर्स घेताना अपघात
यावल शहरात डांगपुरा हा भाग आहे. डांगपुरा भागातून महाराणा प्रताप नगरा कडे जाणार्या रस्त्यावर हडकाई नदीवर एक पूल आहे. मंगळवारी सायंकाळी या पुलाजवळून कार चालक हा कार रीव्हर्स करीत असताना वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि चारचाकी वाहन थेट पुलाच्या खाली हडकाई नदीत कोसळले. प्रसंगावधान राखत चालकाने वाहनातून उडी घेतली म्हणून सुदैवाने प्राणहाणी टळली मात्र या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. अपघात झाल्यानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली होती.
