निंबादेवी धरणातून दुसर्‍या बालकाचाही मृतदेह हाती

गुरांना पाणी पाजण्यासाठी गेल्यानंतर दोन्ही चिमुकल्यांचा झाला मृत्यू


The body of another child was also recovered from Nimbadevi dam यावल : तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या अगदी पायथ्याशी असलेल्या निंबादेवी धरणात गुरांना पाणी पाजण्यास गेलेल्या दोन आदिवासी बालकांचा पाण्यात बुडून मृत्यु झाला होता. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली होती. बुडालेल्या एका बालकाचा मृतदेह रात्री हाती आल्यानंतर दुसर्‍या बालिकेचा मृतदेह बुधवारी सकाळी धरणातून काढण्यात आला. आसाराम शांतीलाल बारेला (14) व निरमा किसन बारेला (9, दोन्ही रा.निमछाव वस्ती) अशी मयतांची नावे आहेत.

वस्तीवर पसरली शोककळा
यावल तालुक्यातील सावखेडासीमजवळ निंबा देवी धरण असून धरण परीसरात गुरे चारण्याकरीता निमछाव येथील बालके आली असता सायंकाळी गुरांना पाणी पाजल्यानंतर धरणाच्या पाण्यात आसाराम शांतीलाल बारेला व निरमा किसन बारेला हे उतरली मात्र अंदाज चुकल्याने दोघे खोल पाण्यात बुडून बेपत्ता झाले. मंगळवारी रात्री आसारामचा मृतदेह आढळला तर निरमा बारेलाचा मृतदेह बुधवारी सकाळी काढण्यात आला. या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संजय देवरे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !