10 हजारांची लाच भोवली : चांदवडचा लाचखोर हवालदार धुळे एसीबीच्या जाळ्यात
10,000 bribe: Chandwad’s bribe-taking constable Dhule in ACB’s net धुळे : दाखल गुन्ह्यात आरोपीविरोधात वाढीव कलम लावून कारवाई करण्यासाठी तडजोडीअंती 10 हजारांची लाच स्वीकारताना चांदवड येथील पोलीस हवालदार हरी जानू पालवी यास धुळे एसीबीने गुरुवारी सायंकाळी अटक केली. चांदवड येथील गणूर चौफुलीवरील चांदवडकर अमृततूल्य चहाच्या दुकानावर हा सापळा यशस्वी करण्यात आला.
असे आहे लाच प्रकरण
तक्रारदार यांचे त्यांच्या भावासोबत शेत जमिनीच्या वहीवाटीवरून वाद झाल्याने चांदवड पोलीस स्टेशन येथे तक्रारदार व त्यांच्या भावाचे एकमेकाविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले. तक्रारदार यांच्याकडून दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपीतांविरुद्ध वाढीव कलम लावून आरोपींवर कारवाई करण्याकरिता तक्रारदार यांचे कडून पंचासमक्ष 20 हजार लाच मागण्यात आली. तक्रारदाराने तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला. लाचेतील पहिल्या हप्त्याचे दहा हजार घेताना आरोपी हवालदाराला अटक करण्यात आली.
यांनी केला सापळा यशस्वी
धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात निरीक्षक मंजीतसिंग चव्हाण, राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, रामदास बारेला, गायत्री पाटील, भूषण शेटे, भूषण खलाणेकर, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, रोहिणी पवार, वनश्री बोरसे, प्रशांत बागुल, जगदीश बडगुजर, सुधीर मोरे यांनी हा सापळा यशस्वी केला.