बोदवड तालुक्यातील पाच शेतकर्‍यांच्या शेतातील केबल वायर लांबवल्या


The cable wires in the fields of five farmers in Bodwad taluka were extended बोदवड : शहरासह परीसरात शेती कामांची लगबग सुरू असताना चोरट्यांनी शेतकर्‍यांच्या इलेक्ट्रीक मोटारीला लावलेल्या कॉपर केबल लांबवल्याने शेतकरी वर्गात खळबळ उडाली आहे.

चोरट्यांचा मोर्चा शेतशिवाराकडे
शेतकरी शेतात ठिबक पाईप लाईनचे काम करीत असतानाच मनुर बु.॥ परीसरात लोणवाडी रस्त्याने शेती असलेले शेतकरी गुणवंत पाटील, अनिरुद्ध पाटील, भगवान बरडे, गोपाळ देशमुख, शेषराव पाटील यांच्या शेतातील चक्क इलेक्ट्रीक कॉपर केबलच लांबवले तर काही अंतरावर या कॉपर केबल जाळून त्यातील कॉपरही लांबवल्याचे स्पष्ट झाले आहे. बोदवड पोलीस ठाण्यात तक्रार केली असल्याचे बाळा पाटील म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !