दहावी परीक्षा निकाल जाहीर : राज्याचा निकाल 93.83 टक्के
10th Exam Result Declared : State Result 93.83 Percent पुणे : दहावी परीक्षेच्या निकालाबाबत उत्सुकता लागली असतानाच बोर्डाने राज्याचा निकाल 93.83 क्के लागल्याचे सांगितले.गतवर्षीच्या तुलनेत 3.11 टक्क्यांनी निकालात घट झाली असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी ऑनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात आला. त्यामध्ये राज्याचा निकाल 93.83 टक्के इतका लागला असून यंदा निकालात घट झाली आहे.
पाच हजार 33 केंद्रावर परीक्षा
दहावीच्या परीक्षेला राज्यातून 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थी प्रविष्ट होते तर 15 लाख 29 हजार 96 परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी 14 लाख 34 हजार 898 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. राज्यातील एकूण पाच हजार 33 केंद्रांवर दहावीची परीक्षा घेण्यात आली. दहावीसाठी 67 विषयात आणि आठ माध्यमात परीक्षा घेण्यात आली. राज्य मंडळाची इयत्ता दहावीची परीक्षा 2 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 या कालावधीत पार पडली. दरम्यान, राज्यातील विद्यार्थी शुक्रवारी दुपारी एक वाजेनंतर संकेत स्थळावर निकाल पाहू शकतील.





विद्यार्थ्यांना येथे पहा दहावीचा निकाल
Mahresult.Nic.In
www.maharashtraeducation.com
www.hscresult.mkcl.org
