रावेर बसस्थानकात मंगळसूत्र चोरताना जळगावच्या चोरट्या महिलेला पकडले
रावेर : एस.टी.बसला वाढलेली गर्दी पाहून भामट्या महिलेने वृद्धेचे मंगळसूत्र लांबवले मात्र त्याचवेळी चोरीची चाहूल लागल्याने जळगावातील तांबापूरा भागातील 45 वर्षीय महिलेला पकडण्यात आले. महिलेला रावेर पोलिसांच्या ताब्यता देण्यात आले असून तिच्याविरोधात रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
चोरी करताना महिला जाळ्यात
रावेर शहरातील बसस्थानक परीसरामध्ये यावल तालुक्यातील अंजाळे येथील मंदाकिनी शांताराम सोनवणे (66) या वृध्द महिला कामाच्या निमित्ताने आली असता बसमध्ये चढत असताना संशयित राधाबाई कैलास गाडे (45, तांबापुरा, जळगाव) ही वृद्धेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरताना आढळल्याने तिला पकडण्यात आले. रावेर पोलिसांना माहिती दिल्यानंतर महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित महिला राधाबाई कैलास गाडे हिला अटक करण्यात आली असून अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. तपास उपनिरीक्षक ईस्माईल शेख करीत आहेत.
