श्री संत मुक्ताईच्या जयघोषात मुक्ताई पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान


Departing of Muktai palanquin to Pandharpur in celebration of Shri Sant Muktai मुक्ताईनगर : 312 वर्षांची परंपरा असलेल्या श्री संत मुक्ताई संस्थानच्या मुक्ताई पालखी सोहळ्याचे आषाढी वारीसाठी शुक्रवारी दुपारी श्री क्षेत्र कोथळी येथून प्रस्थान झाले. जुन्या कोथळी मंदिराच्या सभा मंडपातील छोटेखानी कार्यक्रमात आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून महाआरती केली. पालखी खांद्यावर घेवून तसेच गळ्यात टाळ घेवून मुक्ताई चरणी सेवा दिली. तत्पूर्वी खासदार रक्षा खडसे बर्‍हाणपूरचे आमदार शेरा भैय्या, माजी आमदार अरुण पाटील, जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा अ‍ॅड.रोहिणी खडसे यांनी मुक्ताई दर्शन घेतले. मुलींचे बाल संस्कार शिबिर आणि पालखी सोहळा प्रस्थान निमित्त संत सखाराम महाराज यांचे वंशज हरीभक्त पारायण रामेश्वर महाराज तिजारे यांचे काल्याचे कीर्तन झाले.

यांची होती उपस्थिती
यावेळी संस्थानचे अ‍ॅड.रवींद्र पाटील, पालखी सोहळा नियोजनासाठी आलेले पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे हभप मेघराज महाराज वळखे, निवृत्ती पाटील, विलास धायडे, रवींद्र दांडगे, विशाल महाराज खोले, नितीन महाराज अहिर, विजय महाराज खवले, श्री संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे, उद्धव महाराज जुनारे, संदीप भैय्या पाटील, यु.डी.पाटील, कल्पना हरणे, गीता जुनारे, दुर्गा मराठे महाराज, कृष्णा महाराज, भावराव महाराज, अंबादास महाराज यांच्यासह असंख्य कीर्तनकार, टाळकरी उपस्थित होते. दरम्यान, महाराष्ट्रातून प्रथम प्रस्थान ठेवणारी संत मुक्ताई समाधी स्थळावरून भुवैकूंठ पंढरीला आषाढी वारीसाठी जाणार्‍या मुक्ताई पालखीने शुक्रवारी हजारो वारकरी भाविकांच्या उपस्थितीत मुक्ताईच्या जयघोषात प्रस्थान केले.

पहाटे मुक्ताईची काकाडा आरती
जूने मंदिरावर सकाळचे महाप्रसादाची व्यवस्था पांडुरंग पवार चापोरा व नवीन मंदिरावर दुपारचा महाप्रसाद महाजन परीवाराकडून देण्यात आला. प्रकाश पाटील (नाचणखेडा) यांचे पालखी रथाच्या मानाच्या बैलाचे विधीवत पूजन करून मिरवणूक गुरुवारी काढण्यात आली. शुक्रवारी पहाटे मंगल काकड आरतीने आई मुक्ताईस महापूजा पुंडलिकराव दामोधरराव पवार (चापोरकर) यांच्याहस्ते करण्यात आली. संस्थानचे मानकरी व अध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र भैय्यासाहेब पाटील यांच्याहस्ते पूजारी विनायक व्यवहारे यांनी पादुकांना अभिषेक केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !