हिंगोणा शेत शिवारात 30 वर्षीय महिलेला सर्पदंश
यावल : तालुक्यातील हिंगोणा शेत-शिवारामध्ये 30 वर्षीय महिला काम करीत असताना अचानक तिच्या उजव्या हाताला सर्पाने दंश केला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर तातडीने या महिलेला यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारार्थ आणण्यात आले. या ठिकाणी तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती सध्या स्थिर आहे.
महिलेची प्रकृती स्थिर
हिंगोणा येथील सुनीता ईश्वर हटकर (30) ही महिला हिंगोणा शेत-शिवारात काम करीत असताना अचानक तिच्या उजव्या हाताला सापाने दंश केला. हा प्रकार निदर्शनास येताच शेतातून त्यांना थेट यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारार्थ आणण्यात आले. रुग्णालयात डॉ.प्रशांत जावळे, अधिपरीचारीका नेपाली भोळे, अधिपरीचारिका दीपाली किरंगे, सुमन राऊत, विजय शिंदे आदींनी तिच्यावर उपचार केले.
