भुसावळात दहावीच्या निकालातही विद्यार्थिनीच ठरल्या ‘टॉपर’

यंदा निकालाचा टक्का 1.45 टक्के घसरला ः अनेक शाळांचा शंभर टक्के निकाल ः निकालानंतर जल्लोष


भुसावळ :दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी एक वाजता बोर्डाच्या संकेतस्थळावर जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी निकाल पाहून जल्लोष केला. बारावी परीक्षेप्रमाणेच दहावीत देखील विद्यार्थिनीच टॉपर राहिल्या आहेत तर शहरासह तालुक्यातील अनेक शाळांनी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राहिली. भुसावळ तालुक्यातून यंदा चार हजार 414 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर त्यातील चार हजार 189 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्याचा निकाल 94.90 टक्के लागला. उत्तीर्ण झालेल्यांमधील एक हजार 557 विद्यार्थ्यांनी डिस्टींक्शन तर एक हजार 735 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी व 769 विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी पटकावली. दरम्यान, गतवर्षाच्या तुलनेत यंदा निकालाचा टक्का 1.45 टक्के घसरला आहे. दोन वर्ष कोरोनाच्या संकटानंतर गतवर्षी 2022 मध्ये ऑफलाईन पद्धत्तीने परीक्षा झाल्यानंतर निकाल 96.35 टक्के लागला होता तर 2021 मध्ये कोरोनामुळे मूल्यमापनाच्या आधारे जाहीर झालेल्या निकालाची टक्केवारी तब्बल 99 टक्के होती हे विशेष !

के.नारखेडे विद्यालयाचा 97.53 टक्के निकाल
भुसावळ : शहरातील के.नारखेडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा दहावी परीक्षेचा निकाल 97.53 टक्के लागला. प्रथम तुषार विनोद सोनवणे (94) व कुंदन दीपक बावस्कर (94), द्वितीय- प्राची चंद्रकांत झोपे (93.60), तृतीय- आर्या सुमंत नेहेते (92.40) आली. दहा विद्यार्थी 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाले. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.मकरंद नारखेडे, उपाध्यक्ष डॉ.किशोर नारखेडे, चेअरमन श्रीनिवास नारखेडे, सचिव पी.व्ही.पाटील, सदस्य डॉ.संजीव नारखेडे, भाग्येश नारखेडे, राजकिशोर नारखेडे, विकास पाचपांडे, ऑ.जॉ.सेके्रटरी प्रमोद नेमाडे, विद्यालयाचे मुख्याध्यापक एन.बी.किरंगे, उपमुख्याध्यापक आर.ई.भोळे, पर्यवेक्षक वाय.एन.झोपे, पर्यवेक्षक एस.एल.राणे आदींनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करीत गौरव केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !