धक्कादायक : नाशिकमधील लाचखोर महिला शिक्षणाधिकार्‍याकडील रोकड पाहून एसीबीच्या अधिकार्‍यांनाही बसला धक्का


Shocking : ACB officials were also shocked to see cash from bribe-taking female education officer in Nashik नाशिक : शिक्षण संस्थेवर कारवाई करण्यासाठी मुख्याध्यापकाकडून पन्नास हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना महालिकेतील शिक्षणाधिकारी सुनीता धनगर (57, रा.801 रचित सनशाईन, उंटवाडी नाशिक (वर्ग-2) तसेच शिक्षण विभागातीलच लिपिक नितीन जोशी (45, रा. फ्लॅट नंबर 8, पुष्पांकुर अपार्टमेंट, चव्हाण नगर, तपोवन, नाशिक (वर्ग -3) यांना नाशिक एसीबीने अटक केली होती. घर झडतीत सुनीता धनगर यांच्याकडे घबाड सापडल्याने काही क्षण अधिकार्‍यांनाही धक्का बसला. धनगर यांच्या झडतीत तब्बल 85 लाख रुपयांची रोख रक्कम, 32 तोळे सोने आणि 2 फ्लॅट तसेच एक रीकामा प्लॉटची कागदपत्रेही आढळली आहेत.

कारवाई करण्यासाठी मागितली होती लाच
तक्रारदार हे खाजगी शैक्षणिक संस्थेत नाशिकमधील मुख्याध्यापकपदावर कार्यरत होते मात्र त्याना संस्थेने गैरवर्तनाचा ठपका ठेवत मुख्याध्यापक पदावरून बडतर्फ केले. या बडतर्फी विरोधात मुख्याध्यापक शैक्षणिक न्यायाधीकरणाकडे दाद मागितली होती. त्यानुसार त्यांच्या बडतर्फीला स्थगिती देण्यात आली होती. या संस्थेविरोधात कारवाई करण्यासाठी तक्रारदाराने शिक्षणाधिकार्‍यांकडे अर्ज केला परंतु त्यावर पत्र देण्यासाठी मुख्याधापकाकडे 50 हजारांची मागणी करण्यात आली. त्यानुसार मुख्याध्यापकाने एसीबीकडे तक्रार केली. शुक्रवारी सायंकाळी 4.30 वाजेच्या सुमारास धनगर यांच्या कार्यालयातच सापळा रचला. तक्रारदाराकडून धनगर यांनी 50 हजारांची रक्कम स्वीकारताच त्यांना रंगेहाथ अटक करण्यात आली व धनगर यांच्या कार्यालयातील वरीष्ठ लिपिक नितीन जोशी याने हे पत्र बनवून देण्याच्या मोबदल्यात पाच हजारांची लाच घेतल्याने त्यालाही ताब्यात घेण्यात आले.






यांनी केला सापळा यशस्वी
पोलीस निरीक्षक संदीप घुगे, निरीक्षक गायत्री जाधव यांच्यासह कर्मचारी एकनाथ बाविस्कर,प्रकाश महाजन, नितीन नेटारे यांनी हा सापळा यशस्वी करण्यात आला होता. दरम्यान, संशयितांची कोठडी घेवून त्यांची आता सखोल चौकशी केली जाणार आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !