सावद्यात हद्दपार आरोपीची गुप्तीच्या धाकावर दहशत : अखेर आवळल्या मुसक्या
सावदा : गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे वर्षभरासाठी हद्दपार करण्यात आलेला संशयित गुप्तीच्या धाकावर दहशत निर्माण करीत असल्याची माहिती सावदा पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी संशयिताच्या मुसक्या बांधल्या आहेत. शेख जाबीर शेख खलील (40, सावदा, ता.रावेर) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघण
संशयित जाबीर शेख खलील यास 9 जागेवारी 2023 रोजी जळगाव आणि बुलढाणा या दोन जिल्ह्यांमधून एक वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले होते. संशयित एक वर्षांसाठी हद्दपार असतानाही गुप्तीच्या धाकावर दशहत निर्माण करीत सावदा शहरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर 2 रोजी रात्री 11.15 वाजता त्यास अटक करण्यात आली. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या नेतृत्वाखाली सहायक फौजदार महेमूद शहा, हवालदार उमेश पाटील, चौधरी, मोहसीन पठाण, किरण पाटील व मनोज तडवी यांच्या पथकाने केली.
