पश्चिम महाराष्ट्रात 15 घरफोड्या : अट्टल गुन्हेगार आडगाव पोलिसांच्या जाळ्यात
15 house burglaries in West Maharashtra : Indefatigable criminals in the net of Adgaon police नाशिक : शिलापूरातील रहिवासी अक्षय रंगनाथ कहांडळ यांच्या घरात दुचाकीवरून आलेल्या तिघांनी कपाट व कोठीतून लाखो रुपयांची रोकड व साडे बारा तोळे सोन्या-चांदीचे दागिने असा आठ लाखांचा मुद्देमाल लांबवला होता. यंत्रणेने घटनास्थळावरील फिंगर प्रिंटद्वारे चोरट्यांचा शोध घेत अहमदनगर जिल्ह्यातून कुविख्यात चोरट्याचा मुसक्या बांधल्या. संशयिताने आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्रात 15 वर घरफोड्या केल्या आहेत. सोन्या उर्फ लाल्या ईश्वर भोसले (28) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
यांनी केली कारवाई
वरीष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांनी तत्काळ गुन्हा शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अशोक पाथरे व कर्मचार्यांना सूचना देत शोधकार्य सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आडगाव पोलिसांनी मानवी कौशल्य तंत्रज्ञान वापर करून माहिती घेतली असता घरफोडीचे कनेक्शन अहमदनगर जिल्ह्यात असल्याचा सुगावा लागला. आरोपी हा अट्टल गुन्हेगार असून पश्चिम महाराष्ट्रात तब्बल 15पेक्षा अधिक घरफोडी, चोरी, दरोड्याच्या त्याच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत.





जंगलातून केली अटक
संशयित सराईत गुन्हेगार सोन्या उर्फ लाल्या ईश्वर भोसले याचे दोघे भाऊ संशयित मिनल ईश्वर भोसले, संदीप ईश्वर भोसले यांचा पोलिस शोध घेत आहेत. घरफोडीच्या घटनेतील बोटांचे ठसे जुळल्याने चार दिवसांपासून पोलिस उपनिरीक्षक अशोक पाथरे, विलास चारोस्कर, निखिल वाघचौरे, दिनेश गुंबाडे, निलेश काटकर, पप्पू वाघ यांचे पथक नगर जिल्ह्यात चोरांच्या माग काढत पाठलाग करत होते. सोन्या हा येथील एका जंगलात लपून बसला होता.
