रावेर शहरात घरफोडी : 13 हजारांचा ऐवज लांबवला


Burglary in Raver City :  13 thousand compensation delayed रावेर : शहरात मध्यरात्री चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे तेरा हजाराचा मुद्देमाल लांबवल्याने रामचंद्र नगरात खळबळ उडाली. रावेर शहरातील रामचंद्र नगरात गिरीश शरद पाटील हे शनिवारी आपल्या परीवारासह भुसावळ येथे गेल्याने घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधली.

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
2 ते 4 जुनच्या दरम्यान घराचा पुढील लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील सात हजार रुपये एल.जी.कंपनीचा टिव्ही, स्मार्ट वॉच असा एकूण साडे तेरा हजार रुपयाचा मुद्देमाल लांबवला. या प्रकरणी गिरीष पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस कॉन्स्टेबल अतुल तडवी करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !