सांगली हादरले : गोळीबार करीत दरोडेखोरांनी रीलायन्स कर्मचार्‍यांचे हात-पाय बांधत 13 कोटींचे दागिणे लुटले


Sangli shaken : Robbers tied hands and feet of Reliance employees and looted jewelery worth 13 crores सांगली : राज्याला हादरा बसेल असा दरोडा सांगली शहरात घडला. ग्राहक बनून आलेल्या दरोडेखोरांनी रीलायन्स शोरूममध्ये गोळीबार करीत तब्बल 13 कोटींचे सोने लुटले. ही घटना रविवारी दुपारी तीन वाजता घडली. सांगली शहरातील अत्यंत गजबजलेल्या सांगली-मिरज रस्त्यावरील रिलायन्स कंपनीच्या सोन्याच्या शोरूममध्ये अत्यंत नियोजनबद्धरीत्या दरोडा घालण्यात आला.

सांगली-मिरज हमरस्त्यावरील मार्केट यार्ड चौकात व जिल्हा पोलीस मुख्यालयापासून अवघ्या दोन हजार फुटांवरील रीलायन्सच्या शोरूममध्ये हा दरोडा घालण्यात आला.






आधी पोलीस असल्याचे सांगत धमकावले
आठ दरोडेखोरांनी आत प्रवेश करून रीलायन्सच्या व्यवस्थापकाला पोलीस असल्याचे सांगत दुकानची तपासणी करायची म्हणत धमकावले. त्यानंतर शोरूममधील ग्राहकांना बाहेर काढले. त्याच वेळी दुकानातील सुमारे 20 कर्मचार्‍यांचे हातपाय बांधून त्यांना एका खोलीत डांबले. काही कर्मचार्‍यांनी विरोध करताच त्यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याने ग्राहक जखमी झाला. दरोडेखोरांनी दुकानातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे फोडत चार डीव्हीआरएम चोरले.

सोन्यासह महागडे रत्नही लांबवले
रीलायन्सच्या शोरूममधील जवळपास 15 किलो सोने दरोडेखोरांनी पोत्यात भरल्यानंतर महागडी दीडशे विविध रत्ने पेटीत टाकून पुन्हा गोळीबार करत पळ काढल. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेलींसह पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दरोडेखोर एका स्कॉर्पिओ गाडीतून घटनास्थळी आले होते. दरोडेखोर सोलापूर किंवा कर्नाटकाकडे पळाल्याचा संशय आहे. संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !