धुळ्यात गुंगीकारक औषधांची विक्री : संशयित चाळीसगाव रोड पोलिसांच्या जाळ्यात


Sale of narcotic drugs in Dhule : Suspects caught by Chalisgaon Road Police धुळे : शहरातील शब्बीर नगर परीसरात गुंगीकारक औषधांची विक्री करताना चाळीसगाव रोड पोलिसांनी संशयित अकबर अली कैसर अली शेख (34, शब्बीर नगर, धुळे) यास ताब्यात घेतले. संशयिताच्या ताब्यातून 28 हजार 300 रुपये किंमतीचा गुंगी येणारा औषध साठा जप्त करण्यात आला. पंकज ज्ञानोबा शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांन केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहा.अधीक्षक ऋषीकेश रेड्डीस, गुन्हे शाखा निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील, विनोद पवार, संदीप ठाकरे, पंकज नरेंद्र चव्हाण, रवींद्र ठाकुर, संदीप जगन्नाथ पाटील, चेतन झोळेकर, पोकरे, स्वप्नील सोनवणे, पंकज शिंदे, संदीप वाघ, इम्रान शेख, विशाल गायकवाड, देवेंद्र तावडे, शरद जाधव, सोमनाथ चोरे तसेच शासकीय वाहन चालक यांना कुलदीप महाजन आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !