आधी प्रेयसीची केली हत्या : संशय न येण्यासाठी मृतदेहाचे तुकडे करीत कुत्र्यांपुढे घातले
Mira Road rocked by girlfriend’s murder: Cutter kills girlfriend and disposes of body मीरा रोड : श्रद्धा वालकर हत्याकांडाने देश हादरल्यानंतर या हत्याकांडाची कल्पना डोळ्यापुढे ठेवत नराधम प्रियकराने आधी कटरद्वारे प्रियसीची हत्या करीत मृतदेहाचे तुकडे केले व नंतर तुकडे शिजवत कुत्र्यांपुढे घातल्याचा प्रकार उघडकीस आल्याने मीरा रोड परीसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. अपार्टमेंटमधील नागरीकांना दुर्गंधी आल्यानंतर पोलिसांना माहिती कळवण्यात आल्यानंतर हत्याकांडाचा खुलासा झाला. सरस्वती वैद्य (32) असे हत्या झालेल्या प्रेयसीचे तर मनोज साहनी (56) असे अटकेतील आरोपी प्रियकराचे नाव आहे.
मृतदेहाचे तुकडे शिजवत घातले कुत्र्याला
भाईंदर पूर्वेला उड्डाणपुलाखाली शिधावाटप कार्यालयासमोर गीतानगर फेज 7 असून गीता आकाश दीप इमारतीत 704 क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये मनोज साहनी (56) व सरस्वती वैद्य (32) हे दोघे तीन वर्षांपासून भाड्याने मात्र रीलेशनशीपमध्ये वास्तव्यास होते. 4 जूनला साहनी याने सरस्वतीची हत्या करून तिचे कटरने तुकडे केले. तिचा मृतदेह नष्ट करण्यासाठी त्याने काही तुकडे शिजवून ते भटक्या कुत्र्यांना खायला दिले. सहानी याचे रेशनचे दुकान असून त्याचे व सरस्वतीचे 10 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघेही पती-पत्नीप्रमाणे राहत होते मात्र काही दिवसांपासून त्यांच्यात खटके उडत असल्याने हत्या करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.




दुर्गंधी येताच हत्याकांड उघडकीस
सदनिकेतून दुर्गंधी येऊ लागल्याने तसेच संशयास्पद हालचालींमुळे रहिवाशांनी बुधवारी रात्री नयानगर पोलिसांना कळवले. वरीष्ठ निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्याचवेळी लिफ्टमधून पळून चाललेल्या सहानी याला पकडले. फ्लॅटचा दरवाजा उघडला असता मानवी शरीराचे असंख्य तुकडे दिसले. पोलिस उपायुक्त जयंत बजबळे हेही घटनास्थळी होते.