लवकरच घेणार क्रांतीकारी निर्णय विधानसभा अध्यक्षांच्या वक्तव्यानंतर राज्यात चर्चांना उधाण
A revolutionary decision will be taken soon after the statement of the Speaker of the Legislative Assembly sparked discussions in the state मुंबई : आमदार अपात्रेबद्दलचा निर्णयाचा चेंडा विधानसभा अध्यक्षांकडे आल्यानंतर नेमका निर्णय कधी लागणार? याकडे राज्याचे लक्ष असतानाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे. लवकरच आपण क्रांतिकारी निर्णय घेणार असल्याचे ते एका कार्यक्रमात म्हणाल्याने राजकीय समीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
तर मीही घेणार क्रांतीकारी निर्णय
विधानसभेचे माजी अध्यक्ष दिवंगत बाळासाहेब देसाई यांचा चरित्रग्रंथ ‘दौलत’चे प्रकाशन बुधवारी येथे झाले. त्यावेळी नार्वेकर म्हणाले, ज्या – ज्या खात्यात बाळासाहेब देसाई यांनी काम केले, त्या – त्या खात्यात क्रांतिकारी काम करून त्यांनी निश्चितपणे आपला वेगळा ठसा उमटवला. त्यांच्याकडे सोपविलेली सर्वात महत्त्वाची जबाबदारी 1977-78 या काळात विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले काम. सातत्याने माझा उल्लेख सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष म्हणून झाल्यामुळे माझे वय सगळ्यांनाच माहिती असेल. 77 साली माझा जन्म झाला आणि त्याच वर्षी बाळासाहेब देसाईंवर विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी आली. ज्याप्रमाणे त्यांनी राजकीय आयुष्यात क्रांतिकारी निर्णय घेतले, त्यातून बरंचसं शिकून कदाचित मीही लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन.




तर सर्वोच्च न्यायालयात जाणार : खा.संजय राऊत
आम्ही विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीचा मान ठेवतो. महाराष्ट्रात घटनेचा खून होणार नाही, असे मला वाटते. विधानसभा अध्यक्षांनी जर 90 दिवसांत निर्णय दिला नाही तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊ. मेरिट काय आहे हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे, असे सूचक विधान खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी छत्रपती संभाजीनगरात केले.