गुजरात राज्यात खाजगी वाहनातून विदेशी दारूची वाहतूक : पिंपळनेर पोलिसांनी जप्त केला वाहनासह 12 लाखांचा मद्यसाठा


Transport of foreign liquor in Gujarat state by private vehicle: Pimpalner police seized liquor stock worth 12 lakhs along with the vehicle

पिंपळनेर : गुजरात राज्यात प्रतिबंधीत असलेल्या मद्याची अवैधरीत्या वाहनाद्वारे वाहतूक होत असताना पिंपळनेर पोलिसांनी कारवाई करीत विदेशी कंपनीच्या मद्यासह सुमारे 12 लाखांचा मद्यसाठा जप्त केला. नवापूर रोडवरील मळगाव शिवारातील कळंबारीत 9 रोजी रात्री ही कारवाई करण्यात आली. चारचाकी (जी.जे. 27 बी.एस.6487) मधून एक लाख 72 हजारांचा विदेशी दारू तसेच दहा लाख रुपये किंमतीचे क्रेटा वाहन जप्त करण्यात आले. पोलिसांना पाहताच वाहन लॉक करून चालक रात्रीच्या अंधारात जंगलातून पसार झाला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपअधीक्षक संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळनेरचे सहा.पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे, भाईदास मालचे, लक्ष्मण गवळी, कांतीलाल अहिरे, प्रकाश सोनवणे, राकेश, संदीप पावरा, पंकज माळी, कैलास कोळी, विजयकुमार पाटील, रवींद्र सूर्यवंशी, पंकज वाघ, नरेंद्र परदेशी आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !