गुजरात आगाराच्या बसने उडवल्याने दोघे जागीच ठार

तरडी गावात शोककळा : थाळनेर पोलिसात अपघाताचा गुन्हा


Two were killed on the spot when they were blown up by a bus belonging to Gujarat Agar शिरपूर : तालुक्यातील तरडीजवळ गुजरात राज्य आगाराच्या बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुकाचीवरील तरडी येथील दोघे ठार झाले. भागवत कालिदास पाटील (45) व विलास मंगल पाटील (40, रा.तरडी, ता.शिरपूर) अशी मयतांची नावे आहेत. अपघातानंतर तरडी गावावर शोककळा पसरली. अपघातप्रकरणी थाळनेर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.

बसच्या धडकेने दोघे ठार
शिरपूर तालुक्यातील तरडी येथील भागवत पाटील व विलास पाटील हे दोघे शनिवार, 10 जून रोजी रात्री 8.30 ते 9 वाजेदरम्यान दुचाकी (एम.एच.18 बी.एफ. 1887) ने बभळाजकडून तरडी गावाकडे जात असतांना बभळाज ते तरडी गावादरम्यान चोपड्याकडून अहमदाबादकडे जाणारी गुजरात राज्य परीवहन मंडळाच्या बसने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी होवून बेशुद्ध झाले. बभळाज व तरडी येथील ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात हलविले असता ॉक्टरांनी तपासून दोघांना मयत घोषित केले. अपघातानंतर काही वेळ वाहतूक ठप्प झाली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !