धुळ्यातील मोबाईल चोरटा अमळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीचे सहा मोबाईल जप्त
Mobile thief in Dhula in Amalner Police Net : Six stolen mobile phones seized अमळनेर : शहरातील सानेगुरूजी हायस्कूलसमोर उभ्या असलेल्या प्रौढाच्या खिशातून मोबाईल चोरी करताना धुळ्यातील भामट्याला पकडण्यात आले. संशयिताकडून चोरीचे सहा मोबाईल जप्त करण्यात आले. समीर सलीम शहा (21, धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
चोरी करताना संशयित जाळ्यात
शहरातील साने गुरूजी हायस्कूलसमोर अर्बन बँक सोसायटी निवडणुकीच्या कामासाठी सुरेश आसाराम पाटील (58, रामदेव बाबा नगर, धुळे) हे शनिवारी दुपारी अडीच वाजता आले असता असता संशयित समीर शहा हा त्यांच्या खिशातील मोबाईल लांबवत असल्याचे पाटील यांचे मित्र किशोर सूर्यवंशी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी चोरट्याचा पाठलाग करीत त्यास ताब्यात घते पोलिसांना याबाबत माहिती दिली. संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे चोरीचे सहा मोबाईल आढळले. तपास हवालदार प्रमोद पाटील करीत आहेत.