Dhananjay Yerule as Deputy Superintendent of Police of Pachora Divisionराज्यातील पोलीस उपअक्षीकांच्या बदल्या : पाचोरा विभागाच्या पोलीस उपअधीक्षकपदी धनंजय येरूळे
Dhananjay Yerule as Deputy Superintendent of Police of Pachora Division भुसावळ : राज्यातील पोलीस उपअधीक्षक/उपायुक्त दर्जाच्या अधिकार्यांच्या बदल्या राज्याचे गृह विभागाचे अवर सचिव स्वप्नील गोपाल बोरसे यांनी रविवार, 11 जून रोजी केल्या आहेत. त्यात पाचोरा पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत यांची जळगाव शहर पोलीस उपअधीक्षकपदी बदली झाली असून त्यांच्या जागी
राज्य गुप्त वार्ता विभागाचे धनंजय महादेव येरूळे हे बदलून येत आहेत.
साक्रीला विभागाचे साजन सोनवणे नूतन उपअधीक्षक
चांदूर रेल्वेचे संजय फकिरा महाजन यांची नंदुरबार पोलीस उपअधीक्षकपदी बदली झाली असून नंदुरबारचे श्रीकांत डिस्ले यांची छत्रपती संभाजीनगर महामार्ग सुरक्षा पथकाच्या पोलीस उपअधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले साजन रुपलाल सोनवणे यांची साक्री पोलीस उपअधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.