चोपडा शहरात हार्डवेअरचे दुकान फोडत तीन लाख लांबवले


Three lakhs were stolen by breaking into a hardware shop in Chopra city चोपडा : चोपडा शहरातील हार्ड वेअरच्या दुकानात मध्यरात्री तीन चोरट्यांनी धाडसी चोरी करीत तब्बल दोन लाख 92 हजारांची रोकड लांबवल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला तर चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

मध्यरात्री केली चोरी
चोपडा शहरात यावल रोडवरील एम.जी.कॉलेजलगत बंधन बँकेशेजारी तक्रारदार गोपाळ श्रीराम पाटील (रा.यावल रोड, चोपडा) यांचे समर्थ ट्रेडर्स नामक हार्डवेअरचे दुकान आहे. सोमवारी पहाटे दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी तोंडाला रूमाल बांधून सुरूवातीला दुकानाचे शटर वाकवून दुकानात प्रवेश केला व दुकानाच्या ड्रावरमधील दोन लाख 92 हजार रुपयांची रोकड लांबवली. चोरीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सोमवारी पहाटे दुकानात चोरी झाल्याची माहिती कळताच दुकान मालक गोपाळ पाटील यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर यंत्रणेने पाहणी केली. पाटील यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. तपास हवालदार दीपक विसावे करीत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !