उत्तर भारतासह दिल्लीत 5.4 तीव्रतेचा भूकंप


5.4 Magnitude Earthquake in Delhi along with North India दिल्ली : उत्तर भारतासह दिल्ली व एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरीकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानासह चीनमध्ये भूकंपाने हादरे बसले. भारतात भूकंपाची तीव्रता रीश्टर स्केलवर 5.4 इतकी मोजण्यात आल्याचे सूत्र म्हणाले.





भूकंपाचा केंद्रबिंदू जम्मूकाश्मीर
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू जम्मू-काश्मीरमधील डोडा येथे होता. त्याची खोली जमिनीच्या आत सहा किलोमीटर होती. हे धक्के बराच वेळ जाणवत होते मात्र आतापर्यंत भारत किंवा पाकिस्तानातून कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची माहिती मिळालेली नाही. पाकिस्तानात भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.2 इतकी मोजण्यात आली.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !