खंडाळा घाटात टँकरला आग : चार जणांचा मृत्यू


Tanker fire at Khandala Ghat: Four killed मुंबई : केमिकल वाहून नेणार्‍या टँकरला मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर सोमवारी सकाळी भीषण आग लागल्याने चार जणांचा मृत्यू तर ती जण जखमी झाले. अपघातानंतर वाहतूक कोंडी झाल्यानंतर यंत्रणेने धाव घेतली. या घटनेत तीघे जमखी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.

गृहमंत्र्यांनी दिली माहिती
उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेबाबत ट्विट केले असून मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेत ती जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना लवकर आराम पडावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. राज्य पोलिस दल, महामार्ग पोलिस, आयएनएस शिवाजी, अग्निशमन दल अशा सर्व यंत्रणा घटनास्थळी असून आता आग आटोक्यात आली आहे. एका बाजूने वाहतूक पूर्ववत करण्यात आली असून दुसराही मार्ग लवकरच सुरू होईल. राज्य सरकार स्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून असल्याचे ट्वीटमध्ये फडणवीस म्हणाले आहेत.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !