उटखेडा येथील गोदामातून 65 हजारांचे धान्य चोरीला
Grain worth 65 thousand was stolen from a warehouse in Utkheda रावेर : रावेर तालुक्यातील उटखेडा येथील गोदामाचे कुलूप तोडून चोरट्यांनी 65 हजारांचे धान्य लांबवल्याने गावात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रावेर पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात चोरट्यांचा पोलिसांकडून शोध
सुनील भास्कर पाटील (उटखेडा) यांचे कुंभारखेडा रोडवर गोदामत असून चोरट्यांनी 12 ते 13 जूनदरम्यान गोदामाचे कुलूप तोडून 56 हजार रुपये किंमतीचे 40 किलो वजनाचे 35 धन्याचे कट्टे तसेच तसेच नऊ हजार रुपये प्रमाणे 50 किलो वजनाचे 14 गव्हाचे कट्टे असे एकूण 65 हजारांचे गव्हासह धने लांबवले. याबाबत सुनील पाटील यांच्या फिर्यादीवरुन रावेर पोलिस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस हवालदार सतीश सानप करीत आहेत.