नेर येथे प्रार्थनास्थळाची विटंबना : चौघांना अटक


Desecration of a place of worship at Ner : Four arrested धुळे : धुळे तालुक्यातील नेर येथे प्रार्थनास्थळाची विटंबना केल्याची घटना घडली होती. धुळे तालुका पोलिसांनी बुधवारी या प्रकरणी चौघांना अटक केली असून त्या व्यतिरीक्त एका अल्पवयीनालाही ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी शोधले आरोपी
धुळे तालुक्यातील नेर येथे 2 जून रोजी रात्री प्रार्थनास्थळाची विटंबना करण्यात आली होती. या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात भादंवि कलम 295 आणि 295 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस प्रशासनाने वेळीच बैठक घेवून समजूत काढल्यानंतर अप्रिय घटना टळली होती. या प्रकरणी पोलिसांनी पुणे एमआयडीसी येथून गणेश छोटू शिरसाठ (22) यास ताब्यात घेतल्यानंतर त्याने इतर साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिल्यानंतर भीमराव सुकलाल कुवर (36), विकी नाना कोळी (21), रोहित अरुण जगदाळे (21) आणि अल्पवयीन विधी संघर्षग्रस्त बालक अशांना ताब्यात घेण्यात आले.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपअधीक्षक साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्ताजी शिंदे व सहकार्‍यांनी केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !