मुंबईहून धुळ्यात येणारे 64 लाखांचे सोने एस.टी.प्रवासात लांबवले : कुरीयर चालकाला डुलकी अन् चोरट्यांना संधी


Gold worth 64 lakhs arriving in dust from Mumbai delayed in ST journey : Courier driver’s nap and opportunity for thieves धुळे : कुरीयर कंपनीच्या डिलेव्हरी बॉयकडील 64 लाखांचे सोने भामट्यांनी लांबवले. ही धक्कादायक घटना एस.टी.महामंडळाच्या बसमध्ये घडली. कुरीअर कंपनीच्या डिलिव्हरी बॉयला बसमध्ये झोप लागल्यानंतर हा प्रकार घडल्याचे समोर आले. या प्रकरणी धुळे शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईहून सोने केले खरेदी
धुळे, जळगाव, नाशिक व नंदुरबार येथील काही सराफांनी मुंबईतून खरेदी केलेले सोने जय बजरंग कुरिअरच्या माध्यमातून धुळे, नाशिक व नंदुरबार येथे आणण्यात येत होते. त्यासाठी जय बजरंग कुरीअर कंपनीच्या विष्णूसिंह शिखरवार (32, रा.नगलादास, जि.आग्रा, हल्ली मुक्काम काळबादेवी, मुंबई) यांच्याकडे जवाबदारी असल्याने या कंपनीने त्यांचा कर्मचारी गोविंद सिकरवर यास सोने घेवून पाठवले होते. गोविंदने नाशिक येथील सराफांचे 50 लाखांचे दागिने पोहचवल्यानंतर तो नाशिक बायपास गाडीने धुळ्यातील व्यापार्‍यांच्या सोन्याच्या दागिन्यांच्या डिलिव्हरीसाठी निघाली

झोप लागली अन् घात झाला !
या प्रवासादरम्यान चोरट्यांनी डाव साधत धुळे, मालेगाव व नंदुरबार येथील व्यापार्‍यांचे सुमारे 64 लाख 80 हजार रुपयांचे दागिने लंपास केले. कुरीअर कंपनीचा कर्मचारी गोविंद सिंह हा धुळे आगारात बस आल्यानंतरदेखील झोपेतच होता. त्याला बसमधील प्रवाशांनी जागे केल्यानंतर गोविंदने कंपनीच्या वरीष्ठांना कळवत पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी सोने खरेदीच्या मूळ पावत्या मागितल्या, तसेच पडताळणीनंतर विष्णूसिंह निनुआ शिकरवार (32, रा.काळबादेवी, मुंबई) याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. पोलिसांनी बसस्थानक परीसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फुटेज मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले असून तक्रारदाराकडून माहिती घेत पोलिसांनी कसून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !