पारोळ्यातील तोतया पोलिसाला धुळ्यात बेड्या
Parola’s fake police are chained in the dust धुळे : माजी होमगार्ड असलेल्या संशयिताने धुळ्यात पोलीस असल्याचे सांगत वयोवृद्धाची दागिने लुटले. या प्रकरणी तक्रार दाखल होताच सीसीटीव्हीद्वारे संशयिताच्या मुसक्या आवळण्यात धुळे शहर पोलिसांना यश आले. भिकन पंडित शर्मा (56, रा.तलाव गल्ली, पारोळा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
बसस्थानकात गाठत लांबवले दागिणे
गोविंद बळीराम माळी (60, रा.सोमेश्वर प्लॉट, धुळे) यांना शेती कामासाठी पैशाची गरज असल्यामुळे ते नाशिकला मुलीकडे पैसे घेण्यासाठी गेले असता मुलीकडून त्यांनी पाच ग्रॅमचे टोंगल आणि चार ग्रॅमचे सोन्याचे कानातले दागिने मोडण्यासाठी घेतले. एका डबीत ते ठेवून ते नाशिक येथून धुळ्यात आले असता शुक्रवारी सकाळी 10 वाजेच्या सुमरास ते धुळ्यातील बसस्थानकात उतरल्यानंतर 56 वर्षीय अनोळखी इसम त्यांच्या जवळ आला व त्याने पोलीस असल्याचे सांगत वयोवृद्धाला सोबत ठेवलेल्या पिशवीत काय आहे? याची विचारणा केली. माळी यांनी पिशवीतील दागिने त्यास दाखवताच संशयिताने वृद्धाला बोलण्यात गुंतवून डबीतील सोन्याचे दागिने शिताफीने लंपास केले. थोड्या वेळाने डबी उघडून पाहिल्यानंतर त्यात दागिने न आढळल्याने वयोवृद्धाने शहर पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली.
सीसीटीव्हीवरून संशयित निष्पन्न
धुळे शहर पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी तपासाची चक्रे फिरविली. बसस्थानकातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर त्यात भिकन पंडित शर्मा (56, रा.तलाव गल्ली, पारोळा) हा निष्पन्न होताच त्यास पारोळ्यातून अटक करण्यात आली व पाच ग्रॅम वजनाचे 10 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे टोंगल जप्त करण्यात आले. संशयित भिकन शर्मा हा पूर्वी होमगार्डमध्ये असल्याने त्यास पोलिसांच्या कामाची व बोलण्याची पद्धत माहिती असल्याने त्याने गैरफायदा घेत गुन्हा केल्याचे सूत्रांनी सांगितले.