शहाद्यातील जिनिंग मिलमधून 15 लाखांची रोकड लंपास


15 lakh cash looted from ginning mill in Shahada शहादा : शहरातील श्रीराम कॉटन फायबर जिनिंग मिलमधून चोरट्यांनी 15 लाख 53 हजारांची रोकड लांबवल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
शहादा पोलिसात अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

धाडसी चोरीमुळे उडाली खळबळ
शहादा शहरात सुनील रोहिदास पाटील (58, गायत्री पार्क, लोणखेडा, ता.शहादा) यांची जिनिंग मिल आहे. चोरट्यांनी 19 ते 20 जुनच्या दरम्यान श्रीराम कॉटन फायबर जिनिंग मिलच्या ऑफिसमध्ये प्रवेश करीत ड्रावरमधील तसेच कपाटातील शेतकर्‍यांना देण्यासाठी आणलेली 15 लाख 53 हजारांची रोकड लांबवली. दरम्यान, चोरी करताना चोरट्यांची छबी कैद झाली आहे. तपास पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली छगन चव्हाण करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !