युवारंग महोत्सवात जळगावच्या मुळजी जेठा महाविद्यालयाला विजेतेपद


शहादा : शहरात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या युवारंग महोत्सवाचा सोमवारी समारोप झला. युवारंग महोत्सवात जळगावच्या मुळजी जेठा महाविद्यालयाने सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त केले तर अमळनेरच्या प्रताप महाविद्यालय उपविजेते ठरले.

युवारंगचा थाटात समारोप
युवारंग महोत्सवाचा समारोप सोमवारी प्रसिध्द मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांच्या उपस्थितीत झाला. प्र.कुलगुरु प्रा.पी.पी.माहूलीकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, मानद सचिव कमलताई पाटील यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होती तर विचार मंचावर व्यवस्थापन परीषद सदस्य दिलीप रामू पाटील, प्रा.नितीन बारी, विवेक लोहार, अधिष्ठाता प्रमोद पवार, युवारंगचे कार्याध्यक्ष दीपक पाटील, प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही.पवार, संस्थेचे मकरंद पाटील, उपनगराध्यक्षा रेखा चौधरी, प्राचार्य आर.एस.पाटील, जयश्री पाटील, समन्वयक उपप्राचार्य डॉ.एन.के.पटेल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष सुनील पाटील, ईश्वर पाटील, सातपुडा साखर कारख्यान्याचे उध्दव पाटील, अधिसभा सदस्य मनिषा चौधरी, दिनेश नाईक, दिनेश खरात, डॉ.सत्यजित साळवे, प्राचार्य डॉ.एन.जे.पाटील, प्राचार्य बी.के.सोनी, प्राचार्य डॉ.एस.पी.पवार, प्राचार्य डॉ.डी.एम.पाटील, प्राचार्य डॉ.पी.एल.पाटील, प्राचार्य सौ.जे.आर.पाटील आदींची उपस्थिती होती.


कॉपी करू नका.