सोनगीरनजीक हरीयाणा निर्मित 21 लाखांचा बेकायदेशीर दारू साठा जप्त : धुळे गुन्हे शाखेची कारवाई


Illegal stock of 21 lakhs seized near Songiran Haryana: Dhule Crime Branch action धुळे : हरीयाणा राज्यात निर्मित दारूची दिल्लीहून मुंबईत होणारी तस्करी रोखण्यात धुळे स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. सुमारे 21 लाखांचा बेकायदेशीर मद्यसाठा जप्त करण्यात आला असून हरीयाणा राज्यातील कंटेनर चालकाला अटक करण्यात आली आहे. रमेश मुन्शीराम कुमार (45, आझाद नगर कॉलनी, इसहार, ता.इसहार, हरीयाणा) असे अटकेतील कंटेनर चालकाचे नाव आहे. शनिवार, 24 रोजी पहाटेच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरील सोनगीरनजीक ही कारवाई करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळे गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांना दिल्लीहून मुंबईत अवैधरीत्या दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सोनगीरनजीक नाकाबंदी लावण्यात आली. शनिवारी पहाटे कंटेनर (जी.जे.08 ए.यु.2358) हा धुळ्याकडे येत असताना पोलिसांनी त्याची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणावर दारूसाठा आढळल्यानंतर चालकाला विचारणा केल्यानंतर त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिल्याने त्यास कंटेनरसह धुळे पोलीस अधीक्षक कार्यालयात आणल्यानंतर वाहनाची तपासणी करण्यात आली असता पाच लाख 54 हजार 880 रुपये किंमतीची मॅकडॉल व्हिस्की, एक लाख 80 हजार रुपये किंमतीची रॉयल चॅलेंज व्हिस्की व 13 लाख 68 हजार रुपये किंमतीची मॅकडोल नंबर वर व्हिस्की, 19 हजार 680 रुपये किंमतीची ऑल सेशन कंपनीची व्हिस्की व दहा लाख रुपये किंमतीचा कंटेनर असा एकूण 31 लाख 22 हजार 560 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यांनी केली ही कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, योगेश राऊत, बाळासाहेब सूर्यवंशी, प्रकाश पाटील, दिलीप खोंडे, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, संदीप सरग, संतोष हिरे, प्रकाश सोनार, मयूर पाटील, राहुल गिरी, कमलेश सूर्यवंशी, मायूस सोनवणे, प्रशांत चौधरी, देवेंद्र ठाकूर, योगेश साळवे आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !