पिंपळनेर पोलिसांची मोठी कारवाई : नाशिकसह साक्री, सटाणा, मालेगावातून दुचाकी लांबवणारे चोरटे 20 दुचाकींसह जाळ्यात


Big action by Pimpalner Police: Thieves who were stealing two-wheelers from Sakri, Satana, Malegaon along with Nashik were caught with 20 two-wheelers. पिंपळनेर, ता.साक्री : पिंपळनेर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या दोन दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या बांधल्या असून त्यांच्याकडून चोरीच्या तब्बल 20 दुचाकी जप्त केल्या आहेत. आरोपींनी साक्री, सटाणा, नाशिक ग्रामीण व मालेगाव भागातून या दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे. शामील पांडु बागुल (21, शेंदवड, ता.साक्री) व रोशन सुरेश गायकवाड (23, विरगाव, ता.बागलाण) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

गोपनीय माहितीवरून कारवाई
पिंपळनेरचे कॉन्स्टेबल राकेश बोरसे यांना दुचाकी चोरट्यांबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सहाय्यक निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांना याबाबत माहिती दिल्यानंतर संशयित शामील बागुलला देशशिरवाडे येथील दुचाकी चोरीच्यागुन्ह्यात ताब्यात घेतल्यानंतर त्याने साथीदार रोशनही गुन्ह्यात सहभागी असल्याचे सांगताच त्यालाही अटक करण्यात आल्यानंतर चोरीच्या तब्बल 20 दुचाकी जप्त करण्यात आल्या. आरोपींनी नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील छावणी मालेगाव कॅम्प, वडनेर ठाकुर्डी, सटाणा परीसरातून 20 दुचाकी चोरी केल्याची कबुली दिल्याने या दुचाकी जप्त करण्यात आल्या तर आणखी काही चोर्‍या उघडकीस येण्याची शक्यता आहे.

यांनी केली कारवाई
धुळे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी श्रीकृष्ण पारधी, भाईदास मालचे, लक्ष्मण गवळी, कांतीलाल अहिरे, प्रकाश सोनवणे, अतुल पाटील, भास्कर सूर्यवंशी, राकेश बोरसे, प्रणय सोनवणे, पंकज माळी, विजयकुमार पाटील, रवींद्र सूर्यवंशी, पंकज वाघ, दावल सैंदाणे, नरेंद्र परदेशी आदींनी ही कारवाई केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !